अक्षय तृतीया [Akshaya Tritiya] २०२५
अक्षय तृतीया हा आपल्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो . असं म्हणतात या दिवशी आपण जे काही चांगलं वाईट काम करतो ते अक्षय म्हणजे निरंतर काळासाठी आपल्याला त्याचा फायदा मिळतो.
या दिवशी कोणतेही शुभ कार्य मुहूर्त न पाहता करता येतात. या साठी बरेच लोक सोन खरेदी करताना दिसतात. मराठी महिना वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करतो. या मागील कारण म्हणजे या दिवशी सोन खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी नांदते.
महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखाजी” म्हणून संबोधले जाते , खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो.
![]() |
| Akshaya Tritiya |
पौराणिक महत्व :
१. या विशेष दिवशी वेद महर्षी व्यासांना भगवान गणेशाने महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली. म्हणूनच अक्षय्य तृतीया हा महाभारताच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे.
२. भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला होता . परशुराम हे रेणुकादेवी आणि जमद्ग्नि यांचे पुत्र होते.
३. नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच झाला होता.
४. अक्षय्य तृतीया हा एक विशेष दिवस आहे जो सत्ययुग नावाच्या एका कालखंडाचा शेवट आणि त्रेतायुग नावाच्या दुसऱ्या कालखंडाची सुरुवात दर्शवतो असे मानले जाते.
५. अक्षय्य तृतीया म्हणजे आई अन्नपूर्णा यांचा खास वाढदिवस. या दिवशी माता अन्नपूर्णेला प्रसन्न केले तर आपल्या घरात आयुष्यभर घरात सुख, समृद्धी नांदते.
६. हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं कारण याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्रय संपवले होते.
७. महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी वनवासात असलेल्या पांडवांसाठी द्रौपदीला ‘अक्षय्य पात्र’ भेट दिले होते. याच पात्राला ‘द्रौपदीची थाळी’ या नावानेही ओळखले जाते. त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे. ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही.
८. अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती, असे म्हटले जाते .
९. याच दिवशी भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले.
पूजा विधी:
१: या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठावे व लगेचच शुद्ध पाण्याने स्नान करून घ्यावे.
२. घरात पवित्र स्थानावर चौरंग किंवा पाट ठेऊन त्यावर प्रभू विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
३. खालील दिलेला मंत्र म्हणत प्रभू विष्णूंना पंचामृताने अंघोळ घालावी.
मंत्र :
भगवत्प्रीति कामनया देवत्रय पूजन महं करिष्ये।
५. ११ किंवा २१ तुळशी पात्रांनी तसेच सुगंधित पुष्पांनी प्रभू विष्णूंचा अभिषेक करावा.
६. जव किंवा गव्हाचा सातू, काकडी आणि चण्याची डाळ यांचा नैवेद्य अर्पित करावा.
७. एका पेल्यात पाणी घेऊन त्यात २-३ तुळशीपत्र टाकावे. हा पेला समोर ठेऊन विष्णू सहस्रनामाचा जप करावा.
८. जप झाल्यावे पेल्यातील पाणी पिऊन घ्यावे.
९. श्रद्धा पूर्वक विष्णूची आरती करावी.
या दिवशी दान करण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. वर्षभर दान न करणारे सुद्धा या दिवशी दन करून अक्षय पुण्य प्राप्त करतात. या दिवशी दान केल्याने दान करणाऱ्याच्या घरात पैसा,अन्नधान्य व सुखसमृद्धी आणत काळासाठी नांदते. तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव राहते.
कोणत्या गोष्टी दान कराव्यात:
- जवस: या दिवशी जवस दान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. शास्त्र मध्ये जवस हे कनक म्हणजे सोन्याच्या बरोबरीचे मानले गेले आहे.
- अन्नधान्य: या दिवशी तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी तसेच इतर धान्य सुद्धा दान करू शकता. या मुळे माता अन्नपूर्णा प्रसन्न होते.
- पाणी: मुळात अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यात असल्या मुळे उन्हाळ्याचे दिवस असतात. या दिवसात मानवाला तसेच सगळ्या प्राण्यांना सतत पाण्याची नितांत आवश्यकता भासत असते. त्यामुळे आपल्या घरा बाहेर अथवा एखाद्या झाडाखाली किंवा जिथे जाईल तिथे तुही एक पाण्याचा मठ भरून ठेऊ शकता. तसेच या दिवसात तुम्ही गरजू व्यक्तीला माठ सुद्धा दान करू शकता.
कोणत्या गोष्टी विकत घ्याव्या:
अक्षय्य तृतीयेला, सोने खरेदी करण्याचा हा एक विशेष दिवस आहे कारण ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. सोने खरेदी करणे हा पैसा वाचवण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि हे दाखवते की तुमच्याकडे संपत्ती आहे
अक्षय्य तृतीयेला नवीन व्यवसाय सुरू केल्याने नशीब आणि यश मिळेल असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेले व्यवसाय खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
नवीन वाहन खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीया हा एक खास दिवस आहे कारण तो वाहनाला नशीब आणि दीर्घायुष्य देईल असे मानले जाते.
अक्षय तृतीया हा एक विशेष दिवस आहे जेव्हा नवीन घर खरेदी करणे भाग्यवान मानले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी सकारात्मक ऊर्जा घर भरते आणि जर तुम्ही या दिवशी घर खरेदी केले तर ते नेहमी आनंदी राहते आणि चांगले भाग्य आणते.
अक्षय्य तृतीया कशी साजरी केली जाते?
देवी-देवतांना अभिवादन करण्यासाठी हा दिवस भारताच्या विविध भागात कसा साजरा केला जातो ते पाहूया-
- महाराष्ट्रात, महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्यासाठी हळदी आणि कुमकुमची देवाणघेवाण करतात, जे वैवाहिक आनंदाचे चिन्ह आहेत. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी ते या पवित्र दिवशी गौरी देवीची पूजा करतात.
- ओरिसामध्ये, हा दिवस प्रसिद्ध रथयात्रेसाठी रथ बांधण्याचे काम सुरू होते.
- उत्तर प्रदेशात, वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात, आशीर्वाद घेण्यासाठी देवतेचे पाय लोकांसमोर उघडले जातात. धर्मग्रंथानुसार, हा दिवस देवाने विश्वाची निर्मिती केल्याचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच तो अत्यंत महत्त्वाचा आहे.
- पश्चिम बंगालमध्ये, देवी लक्ष्मीची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते कारण हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो आणि लोक त्यांच्या जीवनात विपुलता मिळविण्यासाठी मौल्यवान धातू खरेदी करतात.
अक्षय्य तृतीयेचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व:-
अनेक शुभ लाभांमुळे हा दिवस जादुई मानला जातो, त्यामुळे आता आपण या दिवसाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व पाहू. ज्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या दिवशी आखा तीज 2024 साजरी केली जाते. वृषभ राशीच्या घरामध्ये चंद्राचे स्थान असताना देखील हीच वेळ आहे.
हा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया आहे. या काळात सूर्य आणि चंद्र दोन्ही सर्वात तेजस्वी असतात असे मानले जाते. तथापि, याचा अर्थ असा नाही की ते या दिवशी सर्वात जास्त प्रकाश उत्सर्जित करतात; त्याऐवजी, याचा अर्थ असा आहे की या खगोलीय पिंडांची स्थिती अशी आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जास्तीत जास्त प्रकाश पोहोचतो.
म्हणूनच या काळात त्यांची प्रतिष्ठा सर्वोच्च असते, हा काळ अत्यंत शुभ आहे. नशिबाला सर्वोच्च असे म्हणतात, आणि म्हणूनच या दिवशी प्रकल्प सुरू करण्यासाठी भाग्यवान मुहूर्त शोधण्याची गरज नाही.

4 Comments
Nice Information
ReplyDeleteThank you.
DeleteGood Information
ReplyDeleteThank you.
Delete